नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.



4kNews कामोठे

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा परिषद उलवे, केंद्र वहाळ, तालुका पनवेल येथील शाळेची विद्यार्थिनी कु. समिक्षा महेश मढवी हिने महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समिक्षाने रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उलवे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
समिक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उलवे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तिच्या घरी जाऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी समिक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


या सत्कारप्रसंगी उलवे शहराचे माजी अध्यक्ष  राहुल बाबुराव पाटील, पनवेल तालुका सचिव  निर्दोष केशव गोंधळी, गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनील म्हात्रे तसेच गव्हाण विभाग उपाध्यक्ष बबलू जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
समिक्षाने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक असून, तिच्या यशामुळे उलवे परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता आहे, हे समिक्षाने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top