नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात संपन्न

4k समाचार
पनवेल दि.22 (संजय कदम): पनवेल मध्ये संपन्न झालेल्या चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते त्यांच्या विवाह तस्मै या सेगमेंट चे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उदघाटन झाले, या प्रसंगी चंदू काका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय जोशी, सहव्यवस्थापक योगिता चोगले ह्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे मंदार काणे एंटरटेनमेंट चे मंदार प्रमोद काणे, कोरिओग्राफर शुभांगी खैरे ,तसेच उपस्थित मान्यवर आणि रसिकप्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचसोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे यांना शाल नारळ आणि सुंदर असे चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.  


  फँशन शो च्या परीक्षक स्वाती सोनावणे ,कोरिओग्राफर शुभांगी खैरे यांना ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंस्टाग्राम क्रिएटर प्रणया साळवी , सौरभ भोईर ,लागू बंधू २०२५ ची विजेती कुमारी अक्षता शिर्के या सर्वांना  ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मिसेस २०२५ च्या विजेत्या सौ प्रज्ञा इंगळे ,मिसेस २०२५ च्या विजेत्या कुमारी मयुरी हुडेर या दोघीनांही खूप सुंदर असा क्राऊन ,साश ,ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले 

त्याचसोबत मिसेस मध्ये द्वितीय क्रमांक सौ श्रुती सावंत आणि मिसेस मध्ये पहिला क्रमांक क्रांती पटेल यांनी मिळवला या दोघींना खूप सुंदर असा क्राऊन ,साश ,ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मिस मध्ये द्वितीय क्रमांक साक्षी आणि मिस मध्ये पहिला क्रमांक वैष्णवी दलाल यांनी मिळवला या दोघींना खूप सुंदर असा क्राऊन ,साश ,ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले . सहभागी सर्वाना ट्रॉफी देण्यात आली या कार्यक्रमाचे संपूर्ण परीक्षण सौ स्वाती सोनावणे यांनी केले तर सूत्रसंचालन कोमल डांगे यांनी केले . या कार्यक्रमाला उद्योजिका सौ साक्षी खेडेकर याना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सोबत मेकअप आर्टिस्ट अक्षता लांगोटे आणि चारू सर्पे यांना सुद्धा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. पुन्हा एकदा मंदार काणे एंटरटेनमेंट ला हा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल चंदू काका सराफ यांच्या संपूर्ण परिवाराचे मनापासून आभार !!! सर्व मॉडेल्स ना कपडे प्रतिभा सिंग या डिसायनर नि दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top