महाराष्ट्र  नवनिर्माण  सेना वहाळ पंचायत  समितीच्या  रिंगणात  स्वबळावर  लढणार.

4k समाचार 

उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे )निवडणूक  आयोगाकडून  जिल्हा परिषद  व पंचायत  समितीचे  आरक्षण  जाहीर  करण्यात  आले  आहे .आरक्षण  जाहीर  झाल्यानंतर सर्व  पक्षाचे  पदाधिकारी  तसेच  कार्यकर्ते  निवडणूक  लढण्यास  इच्छुक  आहेत  तसेच  यावर्षी पहिल्यांदाच  महाराष्ट्र  नवनिर्माण  सेना  वहाळ  पंचायत  समितीत  आपला  उमेदवार  देणार  आहे . गव्हाण विभागातील तसेच उलवे नोड  मधिल  सर्व  पदाधिकारी  आणि  कार्यकर्त्यांच्या झालेल्या मिटींग  मध्ये  सर्वांच्या मते  मनिषा  राहुल  पाटील  यांच्या नावावर  शिक्कामोर्तब  करण्यात  आला.   


आता पर्यंत गव्हाण विभागात उलवे नोड मध्ये महाराष्ट्र  नवनिर्माण  सेनेनी  केलेली कामे  व  लोकांचा  प्रतिसाद  बघता  यंदा  महाराष्ट्र  नवनिर्माण  सेनेचे  इंजिन  वहाळ  पंचायत  समितीत  धावणार  असेच  दिसत  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top