पनवेल (6 डिसें ).कामोठे (4kNews)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण भारतामध्ये अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांवर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या दादर चैत्यभूमी या येथे संपूर्ण भारतातील अनेक लोक प्रत्यक्षपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते

पनवेल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ब्लू पॅंथर्स या संघटनेच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना अल्पोपहार,चहा, बिस्किटे व पाणी यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अनेकांनी याचा लाभ घेतला,

स्थानिक राजकीय पक्षातील अनेक नेते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यामध्ये स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, जे एम म्हात्रे, नारायणशेठ घरत, काशिनाथ पाटील, प्रितम म्हात्रे, गणेश कडू, काँग्रेसचे आर.सी. घरत, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नितीन भाई पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जयंत पगडे, मनोहर म्हात्रे, पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, राजेश डांगळे, आंबेडकरी चळवळीचे नेते नरेंद्र गायकवाड, प्रवीण जी खंडागळे, महेंद्रजी मोरे, कमलाकर कांबळे, प्रवीण कांबळे, हिरामण जोशी गुरुजी, सुनील वाघपंजे, शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत जाधव आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यापैकी अनेकांनी ब्लू पॅन्थर्स च्या स्टॉल ला भेट दिली व उत्तम नियोजनाबद्दल पदाधिकाऱ्याचे कौतुक केले.

यावेळी ब्लू पॅन्थर्स संघटनेचे आयोजक राज सदावर्ते, विजय बाबरे, सचिन कांबळे, सुधीर पवार, सचिन तांबे, विजय गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, संजय जाधव, कुणाल लोंढे, आनंद गायकवाड, राहुल गायकवाड नितीन कांबळे, नवनीत गायकवाड, निलेश जाधव, सिद्धार्थ कांबळे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
