पनवेल दि.०७ (संजय कदम) : विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत, रायगड विभागातर्फे गीता जयंती निमित्त शौर्य संचलनचे आयोजन करण्यात आले आहे.

पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पथ संचलन व त्यांनतर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख वक्ते यांची मार्गदर्शनपार सभा होणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना संताचे आशीर्वचनदेखील ऐकायला मिळणार आहे.

या कार्यक्रमातच्या अधिक माहितीसाठी मो. 8286857879 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
