4k समाचार
पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाला स्मरूण तसेच शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कोकण विभाग (जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

सदर नियुक्तीचा कालावधी तीन वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण व एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जनहित कार्याचा प्रचार व प्रसार कराल तसेच पक्षवाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असा विश्वास महाराष्ट्र राज्य डॉक्टर सेल प्रदेशप्रमुख डॉ. धनंजय गोविंदराव पडवळ यांनी नियुक्ती पत्र देताना व्यक्त केला आहे .
