नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण

पनवेल,दि.2: एमएमआर भागात सगळयात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरेाग्य सेवेबाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेकडे पाहिले जाते. त्याच पध्दतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची सर्व टिम पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन, आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहण्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्री. मंगेश चितळे, उपायुक्त श्री.कैलास गावडे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते श्री.परेश ठाकूर, माजी नगरसेवक, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे, अग्निशमन अधिकारी हरिदास सुर्यवंशी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच आज कळंबोली येथील अग्निशमन केंद्राचेही सिडकोकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी आयुक्त श्री. मंगेश चितळे म्हणाले, पनवेल महानगरपालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावरती भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा सुविधा देण्याच्यादृष्टीने विविध उपकरणे पालिका लवकरच खरेदी करणार आहे.

या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची पनवेल, कळंबोळी, नवीन पनवेल असे तीन अग्निशमन केंद्रे झाली आहेत. आज नवीन पनवेल व कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी दोन अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून, नुकत्याच झालेल्या भरती दरम्यान पालिका अग्निशमन विभागात 110 अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे.

या कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी , इमारती या सर्वांचा विचार करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले तसेच समारोप सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top