नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी चा ४ था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा…

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी चा ४ था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा…
मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा ” मराठा भुषण पुरस्कार ” उद्योजक श्री रामचंद्र ढोबळे यांना प्रदान केला.

खांदा कॉलनी(पनवेल 4kNews): सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या वतीने ४ था वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत संत जानाई महिला भजन मंडळाचा ” भजन संध्या ” आयोजित करण्यात आली. सायंकाळी ७ ते १० या वेळेत सभासद स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला व या मध्ये मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक मा श्री रामचंद्र ढोबळे यांना मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक श्री रामदास शेवाळे व श्री विनोद साबळे यांच्या शुभहस्ते ” मराठा भूषण ” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनी हजेरी लावली. मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष जाधव यांनी मंडळाच्या कार्याची तसेच संस्थेने समाजहितासाठी सुरु केलेल्या संस्थेच्या वेबसाईट ची माहिती उपस्तित बांधवाना दिली.

यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात खांदा कॉलनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सहभाग नोंदवला.

सकल मराठा समाज मंडळाच्या या उपक्रमामुळे समाज बांधणीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याचे समाधान कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना मंडळाचे सचिव श्री सदानंद शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top