नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

रविवारी कामोठेत नमो चषक फुटबॉल स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  आयोजित केसात आलेल्या नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारीला सायंकाळी ०४ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा होणार आहे.


   या स्पर्धेतील विजेत्या संघास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी सहा अधिक तीन असा खेळाडूंचा गेम फॉरमॅट असून पाच मुले, एक मुलगी आणि तीन सब्स्टीट्युट असा नऊ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. आणि प्रत्येक संघात एक मुलगी खेळाडू असणे अनिवार्य आहे.  ही अतिशय उत्तम आणि प्रेरणादायी स्पर्धा असून युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी आहे.

ही स्पर्धा म्हणजे केवळ फुटबॉल खेळण्याची संधी नसून, पनवेलच्या क्रीडा संस्कृतीला एक नवीन दिशा देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आणि नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top