पनवेल, दि.8 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटीलांची बैठक घेवून त्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांनी केले.


यावेळी अधिकारी वर्गांनी उपस्थित पोलीस पाटीलांना आवश्यक त्या सुचना देताना सांगितले की, आगामी सण उत्सव कार्यक्रमांबाबत आगाऊ माहिती पोलीस ठाणे देणे, विनापरवाना राहणारे परदेशी नागरिकांची माहिती, भाडेकरूंची परिपूर्ण माहिती संकलित करणे.,

पोलिसांचे व्हाट्सअप चॅनेल, तसेच इतर हेल्पलाइन बाबत यापूर्वीच दिलेल्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करणे., महिला मुली ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षा बाबत माहिती दिली आहे. तसेच उपस्थितांना नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हद्दीतील 42 पोलीस पाटील उपस्थित होते.
