पनवेल, दि.6 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि शंभर दिवस कृती आराखडा अनुषंगाने पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.00 ते 09.00 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह सर्व अधिकारी व अंमलदार यांनी श्रमदान करून पोलीस ठाणे आणि परिसर स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान करून स्वच्छ केला.

त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी माहिती दिली की वरील मोहिमे च्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्वच्छता याकरिता श्री साई गणेश इंटरप्राईजेस नवीन पनवेल या संस्थेकडून पोलीस ठाणे येथे दैनंदिन व साप्ताहिक स्वच्छता सेवा पुरवण्यात येणार आहे.

याबाबत वरील संस्थेकडून पोलीस ठाण्यास लेखी कळविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छते मोहिमेसह नागरिकांना सौजन्याची वागणूक तसेच त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचे आय एस ओ मानांकन निरीक्षण पथकाने दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे भेट देऊन काही सूचना दिलेले आहेत. पूर्तता करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी याप्रसंगी सांगितले.
