नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

व्हिस्टा प्रोसेस फूड्सच्या सी एस आर अनुदान फंडाद्वारे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाख रुपये किमतीच्या औषधांचा ‘डोस’ सुपूर्द!


पनवेल, दि.5 (वार्ताहर) : पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात औषधांचा तूटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेसेड फूड्स च्या सी एस आर अनुदान फंडा द्वारे  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल मध्ये तब्बल दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैदयकीय उपकरणे तातडीने हस्तांतरित करण्यात आली. त्याचा फायदा अनेक गोर गरीब गरजू रूग्णांना होऊ शकेल.  


डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. गीते यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करताना या हॉस्पिटलचा फायदा पनवेल शहर तसेच तालुक्यातील लाखो रुग्ण घेत असल्याचे सांगितले. शिवसेनेचे महानगरप्रमुख ऍड. प्रथमेश सोमण यांनी मार्गदर्शन करताना चंद्रशेखर सोमण व शिवसेना यांनी अनेक वर्षे या हॉस्पिटल साठी कसे प्रयत्न केले व या हॉस्पिटल द्वारे अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून  फायदा  करून दिला याची माहिती करून दिली. विस्टा प्रोसेस फुड कंपनीच्या माध्यमातून यापूर्वीही 2019 व 2023 रोजी तब्बल 20 लाख रुपयांची औषधं व उपकरण उपजिल्हा रुग्णालयास तर मागील पाच वर्षात 25 लाख रुपयांची मदत दयालिसिस रुग्णांसाठी पटवर्धन रुग्णालयाला ही देण्यात आली होती.

त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चा डॉ. गिरीश गुणेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या  प्रामाणिक समाजसेवेचे कौतुक केले. रोटरी प्रांत चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन करताना रोटरी च्या माध्यमातून या उप जिल्हा हॉस्पिटल ला विविध वैद्यकीय उपकरणे वेळोवेळी रोटरी क्लब च्या मार्फत उपलब्ध करून दिली असल्याचे सर्व उपस्थितांच्या निदर्शनास आणले. पनवेल शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी रोटरी क्लब, उप जिल्हा रुग्णालय व विस्टा प्रोसेसेड फूड्स व सोमण कुटुंबीय यांच्या समर्पित रुग्णसेवेचे व कार्याचे कौतुक करून त्यांचे वेळोवेळी सहकार्य  पोलिसांना देखील मिळत  असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी विस्टा प्रोसेसेड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक भुपिंदर सिंग, ज्यांच्या माध्यमातून ही मदत रुग्णालयास करण्यात आली

ते कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार तथा शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण,  रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, शिवसेनेचे ऍड. प्रथमेश सोमण यांचे शिवाय शिवसेना उप महानगर प्रमुख महेश सावंत, पोलिस निरीक्षक अभंग, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, खजिनदार ऋषिकेश बुवा, प्रसाद सोनावणे, माजी अध्यक्ष डॉ. आमोद दिवेकर, डॉ. सह सर्व रोटरी सदस्य, अँनस् व हॉस्पिटल चे सहकारी डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट, काही जेष्ठ नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top