पनवेल, दि.5 (संजय कदम) ः शासनामार्फत करण्यात आलेल्या नवीन कायदे संदर्भात त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती अभियानाचा स्तुत्य उपक्रम पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत शहरातील व्हि.के.हायस्कूल येथे राबविण्यात आला. सदर उपक्रम पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शक म्हणून अॅड.सचिन पटेल यांनी नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अभंग यांनी पोलीस जनता समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच पोलीस उपनिरीक्षक अभय कदम यांनी सायबर गुन्हे संदर्भात मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक अंकुश शेलार यांनी अंमली पदार्थ दुष्पपरिणाम या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे म.पो.उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांनी महिलांविषयी गुन्हे संदर्भात मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना नवीन कायदा, सायबर फ्रॉड, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिलांविषयी कायदे व नवी मुंबई व्हाट्सअप चैनल बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
