पनवेल, (वार्ताहर) ः शिवसेना पक्षाच्या विविध पदाधिकार्यांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांना नियुक्तीपत्र वरिष्ठ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने, मावळचे खासदार, उत्तम संसदपटू, श्रीरंग बारणे यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले व कर्जतचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली

व सहकार्याने, शिवसेनेचे पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख बाळाराम नाईक यांच्या प्रयत्नाने आज बाळासाहेब भवन कर्जत जिल्हा रायगड येथे चंद्रकांत महादेव गुजर शिवसेना पक्षाच्या वडघर जिल्हा परिषद पनवेल ग्रामीण तालुका प्रमुखपदी, नाथाभाई भरवाड वडघर करंजाडे विभाग प्रमुख पदी , बाळासाहेब आवारी यांची शिवसेना पक्षाच्या करंजाडे पंचायत समिती विभाग प्रमुख पदी, वसंत सोनावणे यांची शिवसेना पक्षाच्या करंजाडे उप शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र देताना रायगडचे जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर. व विविध मान्यवरांचे स्वागत केले.
