तालुका विधी सेवा समिती, पनवेल आणि वकील संघटना,पनवेल यांच्या माध्यमातून भानुबेन शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तारा या ठिकाणी बाल दिन साजरा…

दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी बालदिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती,पनवेल आणि वकील संघटना, पनवेल यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पुष्पहार अर्पण करून… साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माननीय श्री.एस.आर.चव्हाण – जिल्हा न्यायाधीश 4 व सह-सत्र न्यायाधीश,पनवेल आणि श्री.एम.डी.सैंदाणे – तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, पनवेल उपस्थित होते.

विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती असतात. विद्यार्थीदशेत मुलं ही अनुकरण लवकर करत असतात. त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे. जेणेकरून उत्तुंग भरारी येणाऱ्या भविष्यात ते घेऊ शकतील. अशा आशयाचं मनोगत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न्यायाधीश चव्हाण साहेब यांनी केले.

प्रतिकूल परिस्थिती ही माणसाच्या यशस्वी होण्याच्या मार्गातला अडथळा होऊ शकत नाही. कारण यशस्वी होणाऱ्या माणसांना संघर्ष हा करावाच लागतो. त्यामुळे आपण अतिशय दुर्गम भागातून – खेड्यापाड्यातून आलो आहोत आहि आपल्या मनात न्यूनगंडाची भावना न ठेवता आपण सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत. या आशयाच मनोगत लीगल एड पॅनल ॲड. इंद्रजीत भोसले यांनी व्यक्त केले.

विद्यालयाचा एकंदरीतच प्रवास शाळेचे मुख्याध्यापक मा. विजय पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून उलगडून सांगितला. समवेत सारे शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमात पनवेल वकील संघटनेचे खजिनदार ॲड. धनराज तोकडे, ॲड. भूषण म्हात्रे – सदस्य, ॲड. नीलम ठाकूर , ॲड. नागेश हिरवे , रिटेनर लॉयर ॲड. सुयश कामेरकर आणि श्री. अविनाश चंदणे – कनिष्ठ लिपिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री. शैलेश कोंडसकर – P.L.V. यांनी केले. आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्री. रत्नाकर घरत यांनी केले. अश्या प्रकारे कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.
