4k समाचार
पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राउळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदका साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होते आहे .

भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी शौर्य पदक (GM), मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) ही पदके व्यक्ती तसेच अधिकारी/कर्मचारी यांना उल्लेखनीय कामगिरी करीता दिली जातात. महाराष्ट्र पोलीस दलातील 39 अधिकारी/कर्मचारी यांची गुणवत्तापूर्ण सेवेच्या पदकासाठी मा. राष्ट्रपती यांचेकडुन निवड करण्यात आली असुन महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील नेमणुकीतील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राउळ यांची निवड करण्यात आली आहे.

सदर पदकासाठी निवड झाल्याने प्रविण साळुंके मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन तानाजी चिखले मा. पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे स्वातंत्र्य दिनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत. सदर कार्यक्रमाचे ठिकाणी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई चे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक संजय टिळेकर तसेच सर्व पोलीस अंमलदार हे उपस्थित होते. पोलीस उप निरीक्षक काशिनाथ राउळ हे 1988 साली पोलीस दलामध्ये भरती झाले असुन त्यांनी 37 वर्षाच्या सेवाकाळामध्ये राज्य राखीव पोलीस दल, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच महामार्ग पोलीस पथक येथे कर्तव्य बजावले आहे. दि. ३१/१०/२०२५ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असुन त्या अगोदर मा. राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) साठी त्यांची निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
