4k समाचार
पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : यंदाच्या महानगरपालिकेसह इतर सर्व निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व राखणार असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शिवसेना सुकापुर शाखेचे उद्दघाटन प्रसंगी केली . हे उद्दघाटन शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभ हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

शिवसेना ही ८०% समाजकारण व २०% राजकारण करणारी संघटना आहे. याचे उदाहरण म्हणजे आज झालेल्या शाखेच्या उद्दघाटन प्रसंगी १० वी व १२ वी उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असे शिवसेना नेते अनंत गीते यांनी म्हटले. सुकापुर शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, उपशाखा प्रमुख सचिन खरात, डॉ. सेल चे उपाध्यक्ष डॉ. आशीष बांदेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.यावेळी उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, रामदास पाटील, युवासेना जिल्हाअधिकारी पराग मोहिते,

विधानसभा अधिकारी अजय पाटील, युवासेना तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, विभाग प्रमुख विशाल भोईर, शेकापचे राजेश केणी, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, ऋषभ मोहिते, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, उपतालुका संघटिका सौ. तनुजा झुरे, शिवसेना महानगर संघटिका लिना गरड, सौ. मालती पिंगळा, सौ. वैशाली थळी, सौ. निशा कदम, सौ. नम्रता शिंदे, यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व सुकापुरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
