पनवेल दि. १7 ( वार्ताहर ) : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय येथील 81 आदिवासी विद्यार्थ्यांना बूट आणि सँडल्स वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. तिरमाले यांनी केले. सरगम क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी सांगितले की सलग तीन वर्षे सरगम क्लब तर्फे या शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणि शाळेतर्फे नेहमीच क्लबच्या उपक्रमांना सहकार्य मिळते.,ला. मिलिंद जोशी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम चे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा, सह सचिव ओंकार खेडकर, सह खजिनदार अनिल परमार, मिलिंद जोशी, शाळेचे मुख्याध्यापक तिरमाले सर,मोपरे सर, डी के पाटील सर, गुंजाळ सर, वेळेकर सर, पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.या सर्व बूट आणि सँडल्स चा खर्च सरगम क्लबचे वतीने अनिल परमार यांचे तर्फे करण्यात आला.
