पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर परिसरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

सदर इसमाचे नाव अजय करन निशाद (45 रा.लोखंडीपाडा) असे असून या ठिकाणी एकटाच राहत होता व मिळेल ते काम करत असे. त्याच्या डोक्यावरील केस काळे, मिशी व दाढी बारीक, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच आहे. तसेच उजवा हात खांद्यापासून नाही. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 येथे संपर्क साधावा.
