4k समाचार
उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्ह्यात सर्वत्र साखर चौथीचे सार्वजनिक, वैयक्तिक रित्या गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उरण तालुक्यात साखर चौथीचे गणपती उरण मध्ये विराजमान झाले होते.साखर चौथीच्या गणेशोत्सवला शंभर वर्षांच्या काळाची परंपरा आहे.लोकमान्य टीळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक रूपात साजरा केला जातो.दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव संपला कि कोकण विभागात साखर चौथीच्या गणेशोत्सवला सुरवात होते.

उरण शहरात वादन एक कलाचा राजा या ढोल ताशा पथकाच्या संघटने तर्फे श्री गजानन कृपा निवास, कामगार वसाहत,इनामदारवाडी, कामठा रोड उरण शहर येथे वादन एक कलाचा राजा २०२५ सार्वजनिक गणेशोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे दरवर्षी सार्वजनिक रित्या साखर चौथीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदाचे गणेशोत्सव साजरी करण्याचे संस्थेचे / संघटनेचे हे पाचवे वर्षे होते. गणेशोत्सव निमित्त सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद,गेम्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, हौशी स्पर्धा आदी विविध मनोरंजन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीकृष्ण रूपातील गणेश मूर्ती व पर्यावरण पूरक सजावट हे यंदाच्या गणेशोत्सवचे सर्वांचे आकर्षण ठरले. वादन एक कलाचा राजाचे संस्थापक ओमकार घरत, अध्यक्ष तेजस म्हात्रे,उपाध्यक्ष मयूर केकतपुरे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी,सर्व सदस्यांनी हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सदर गणेश मूर्तीचे उरण शहरातील विमला तलावात ढोल ताशाच्या गजरात मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आले.
