पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या नातवाच्या शुभविवाहप्रित्यर्थ उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्या.

मानकोळी नाका येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीत व मानसी यांना विवाहप्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी बबनदादा पाटील तसेच चंद्रहास भोईर यांनी ठाकरे कुटुंबियांचे स्वागत केले.
