रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने महाराष्ट्र स्तरावर आयोजित केलेल्या ऊर्जा मेळ्यामध्ये १० शाळांमधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीज मधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.

रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी टाटा कंपनी मार्फत उर्जा मेळा २०२४ या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणाचे महत्त्व वाढविणे हा आहे. यामध्ये विज्ञान, चित्रकला, प्रश्न मंजुषा स्पर्धा, पोस्टर मेकिंग, विज्ञान कार्य मॉडेल अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
