पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पत्नीला भेटण्यासाठी ठाण्याला जात आहे असे सांगून घरातून निघून गेलेला 32 वर्षीय तरुण घर न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आदित दिलीप क्षीरसागर (32) असे त्याचे नाव आहे. त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट दहा इंच, मध्यम बांधा, उभट चेहरा, नाक सरळ असे त्याचे वर्णन असून त्याने अंगात फुल बाह्यांचा पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली. त्याला मराठी आणि इंग्रजी भाषा बोलता येते अशी माहिती त्याच्या कुटुबियांनी दिली आहे. या तरुणाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तळोजा पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
