नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
How to Accept Deposits and Partial Payments in WordPress (No WooCommerce)
Open Channels FM: Introducing Open Source Champions
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये “महाराष्ट्राची महासंस्कृती”

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला “महाराष्ट्राची महासंस्कृती” या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


 सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल जवळील या मैदानावर सायंकाळी ०६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा आमदार महेश बालदी, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, समितीचे सरचिटणीस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


महाराष्ट्राची महासंस्कृती”मध्ये महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीत, गणगवळणी, लावणी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्यरचनांचा समावेश असून या कार्यक्रमात विशेषतः “शिवराज्याभिषेक सोहळा” सादर होणार असून या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top