नवीन बातम्या
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
How to Build a WooCommerce Print Shop Order Form With File Upload
OpenStation Blog: A better way to use WordPress
Open Channels FM: OCN Week in Review #4
Open Channels FM: Drawing the Line Between Openness and Noise in the Digital World
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

कामोठे येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

4kNews कामोठे दि. 3
कामोठे : येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याच परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच भक्तिगीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सादरीकरणातून संगीताविषयीची निष्ठा, साधना आणि गुरूंप्रती असलेला आदर स्पष्टपणे जाणवत होता.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दत्तात्रय कुलकर्णी आणि सौ. नंदाताई कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध संगीत परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण रियाज, शिस्त आणि गुरुंचे मार्गदर्शन हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे सांगितले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या संस्थापक सौ. रोहिणी विनायक देशपांडे आणि श्री. विनायक देशपांडे यांचा पुष्पगुच्छ व विशेष भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाबद्दल मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते पल्लवी देशपांडे यांचे शास्त्रीय गायन. त्यांनी सादर केलेल्या ‘राग पुरिया धनाश्री’ या रागाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट स्वरलगाव, रागदारीचे सखोल ज्ञान, सुरेल मांडणी आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे त्यांच्या गायनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. नुकत्याच झालेल्या शास्त्रीय गायन परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून त्यांनी विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर, ओघवत्या आणि नेटके शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. गुरुपौर्णिमेचा हा संगीतमय सोहळा गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि संगीतप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.
बक्षीस प्राप्त आणि सादरीकरण केलेले विद्यार्थी



गुरुपौर्णिमेच्या या सोहळ्यात खालील विद्यार्थ्यांनी शास्त्रीय आणि सुगम संगीत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले तसेच आपल्या कलागुणांचे सुरेल सादरीकरणही केले:
१. सुगम संगीत विभाग:
प्रवेशिका:अद्वैता कुलकर्णी आणि निधी परब
गीत प्रथमा:सोहम पोरे आणि अविराज कचरे
गीत द्वितीया शितल कुलकर्णी आणि विद्या कदम
गीत मध्यमा:मनीषा माने आणि जानकी देशपांडे
२. शास्त्रीय संगीत विभाग

प्रारंभिक वेद सचिन कार्लेकर (तबला) आणि निधी साहेबराव जाधव (गायन)
प्रवेशिका (२ री)राघव पांडे (तबला) आणि साईशा प्रधान (गायन)
प्रवेशिका पूर्ण (३ री):सुषमा मुळे (गायन) आणि विद्या कदम (गायन)
मध्यमा परीक्षा पल्लवी देशपांडे (गायन – प्रथम श्रेणी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top