नवीन बातम्या
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
How to Build a WooCommerce Print Shop Order Form With File Upload
OpenStation Blog: A better way to use WordPress
Open Channels FM: OCN Week in Review #4
Open Channels FM: Drawing the Line Between Openness and Noise in the Digital World
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

पनवेल महानगरपालिकेचा प्रताप, नियुक्ती आदेश नसताना सेवानिवृत्त अधिकारी चालवत आहे पालिकेचा कारभार ?

4,kNews कामोठे दि. 4

पनवेल महानगरपालिकेने पालिकेचे विविक्षित कामे करण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन आदेशानुसार पालिकेने कामे करण्यासाठी अ व ब संवर्ग गटातील अधिकारी यांची तीन वर्षाकरिता नेमणूक केली होती होती. परंतु अनेक सेवानिवृत्त अधिकारी यांचे कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ही हे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पालिकेत कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रहाराने पालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पालिका आयुक्त यांनी याची गंभीर दखल घेत २८ सेवानिवृत अधिकारी यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जारी करून मार्च महिन्यात त्यांची नियुक्ती रद्द केली असताना, यातील अनेक सेवानिवृत्त अधिकारी प्रशासनाचे कोणतेही कार्यालयीन आदेश नसताना पालिकेत कामे करत असल्याचे पुन्हा निदर्शनास आले असल्याने या गंभीर प्रकरणी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेत सखोल चौकशी करण्याची मागणी केली व महापौर नितीन पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असल्याची माहिती डॉ. सुनील शिरीषकर, प्रहार सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष रायगड यांनी दिली आहे.  



तसेच प्रहार संघटनेने यात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत की, हे संबधित सेवानिवृत्त अधिकारी कोणाच्या आदेशावरून पालिकेत नियमबाह्य पद्धतीने काम करत आहेत? हे सेवानिवृत अधिकारी मालमत्ता विभाग व आरोग्य विभागात बिनदिक्कतपणे कसे काम करतात. तसेच यांना पालिकेने कोणतेही लेखी परवानगी दिली नसल्याने हे सेवानिवृत्त अधिकारी बेकायदेशीर व अनधिकृतपणे पालिकेत कसे येवून कामे करत आहेत व प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्याचा वरदहस्त यांच्यावर आहे ? 

यात सेवानिवृत्त अधिकारी आणि पालिका प्रशासन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याची ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईसह याला प्रशासनातील जे अधिकारी जबाबदार असतील त्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी करावी अशी ही मागणी केली, यावेळी प्रहारच्या वतीने डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड, ऐड. मनोज टेकाडे, अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना, ऐड. अजय तापकीर संपर्क प्रमुख कोकण, अजय कदम, अभिनव येलवे, राहुल तेलंग, पंकज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top