4kNews कामोठे
उरण, दि. 6(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धुतुम खालची आळीच्या वतीने शंकर मंदिरात पूजा, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व भारती समाधान कटेकर यांच्या हस्ते सप्ताहाचा अभिषेक व पूजाविधी करण्यात आला.

गावात सुख, शांती व समृद्धी नांदावी, यासाठी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करण्यात आली. जन्माष्टमी निमित्त रात्रभर नामस्मरण, भजन व जागर करण्यात आला.
सालाबादप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रघुनाथ ठाकूर यांच्या निवासस्थानीही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, भाविक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर यांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे धुतुम गावात रात्रभर श्रीकृष्णमय वातावरण निर्माण झाले होते.

