4kNews कामोठे दि. 9
कामोठे : ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नवी मुंबईचा ‘आगमनाधीश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामोठ्याच्या विघ्नहर्ताचे भव्य महाआगमन उत्साहात पार पडले. अटल सेतूवरून कामोठ्याच्या दिशेने निघालेल्या मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले.

कामोठ्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ढोल-ताशा व लेझीम पथकांसह पारंपरिक वेशभूषा आणि विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले. विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अटल सेतू ते कामोठे या दिमाखदार आगमन सोहळ्यातून कामोठेकरांची श्रद्धा, एकजूट आणि गणेशभक्तीचे दर्शन घडले. ठिकठिकाणी नागरिकांनी विघ्नहर्ताचे उत्स्फूर्त स्वागत केले.

