कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

4kNews कामोठे दि 17कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top