नवीन बातम्या
१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर
स्वातंत्र्य दिन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये वैचारिक मंथन; उदय निरगुडकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी; तरुणांशी संवाद
नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती
८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
मुलीला उचलल्यानंतर छातीत आली कळ; न्यूमोथोरॅक्सवर यशस्वी कीहोल शस्त्रक्रिया
ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व पुरोहित सुधाकर ठाकूर यांचे निधन.
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरीचा ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान
संगीतसाधनेचा डिजिटल स्वरमंच; रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या वेबसाईटचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात अनावरण

८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!


4kNews कामोठे दि. 18
आज कामोठे शहरात शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष मा. गौरव पोरवाल जी यांच्या पुढाकाराने आणि आमदार मा. बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या शहराची अहोरात्र सेवा करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
घंटागाडी कर्मचारी हा आपल्या समाजातील अत्यंत उपेक्षित आणि कष्टकरी घटक आहे. आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आपल्या सेवेसाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात.



याच भावनेतून आम्ही आतापर्यंत वीज विभागातील कर्मचारी, आपल्या घरात काम करणाऱ्या महिला, आशा वर्कर्स, स्मशानभूमीतील कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच समाजातील विविध सेवा देणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण केले आहे.
या सर्व कष्टकरी बांधवांच्या सेवेला माझा मनापासून सलाम आणि त्यांचा मी मनःपूर्वक सन्मान करतो. 



कारण ही माणसं आपल्या जीवनातील प्रथम प्राधान्याची सेवा बजावत आहेत. हे सर्व लोक आपल्या सोबत नसतील, तर आजच्या काळात आपले दैनंदिन जीवन जगणे देखील अत्यंत कठीण होईल.
या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया—
समाजासाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या या सर्व कष्टकरी घटकांचा सन्मान करूया आणि त्यांना असे स्थान देऊया की, ते आपली सेवा अधिक आनंदाने आणि अभिमानाने करू शकतील.



त्यांच्या कष्टांचा सन्मान करणे, हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा सन्मान आहे. समाजाच्या स्वच्छतेसाठी २४ तास मेहनत करणाऱ्या या उपेक्षित, कष्टकरी बांधवांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवणे हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिनाचा गौरवपूर्ण क्षण होता.
या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नाना भगत, सचिन झंझणे,नितीन पगारे, अरुण भालेराव, संदीप पावटी, शुभक्षणमची संपूर्ण टीम. रजनीश सिंह, प्रमोद हाडावले, अनिल हाडावले तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top