नवीन बातम्या
Open Channels FM: BackTalk on DevRel, APIs, Digital Freedom
Introducing HelpJet: The AI Chatbot That Answers Your Customers’ Questions in Seconds
Hostinger Review: Job Title Says Web Host, Resume Says a Lot More
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ स्लॅब कोसळला; वाहतुकीवर परिणाम, प्रशासनाचे प्रवास टाळण्याचे आवाहन
Matt: USA 250
सलूनमधील टीव्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का?; मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण

पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी

साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता
कार्यकर्त्यांच्या
डोळयांच्या पाणवल्या कडा


अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर  शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने स्वीकारत आपण जिगरबाज आहोत हे दाखवून देत कार्यक्रमास उपस्थित राहिले

कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीमधून प्रितम म्हात्रे खाली उतरताच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घालून आपल्या जिगरबाज नेत्याला अभिवादन केले. चेहऱयावर पराभवाचे सावट सुद्धा नव्हते. स्मितहास्य चेहरा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 24 तास सुद्धा झाले नसताना प्रितम म्हात्रे यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजायला सुरवात केली आहे

. याची गोळा बेरीज त्यांना आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कामाला येणार आहेत. नेता हा जनसामान्य जनतेला आपला वाटणारा असावा याचे आज जमलेल्या जनतेने अनुभवले कार्यक्रमाच्या ठीकाणी असणारया जेवणासाठी प्रितम म्हात्रे पंगतीमध्ये जाऊन बसले. त्यांची ही कृती पाहून युवकांनी त्याचे फोटो काढून आपले स्टेटस ला ठेवले आहेत.

त्यांचा हा साधेपणा पाहून महिला वर्गामध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली.  झालेला पराभव स्वीकारत मतदारसंघात पुन्हा भेटीगाठी  सुरू केलेले प्रितम म्हात्रे खऱ्या अर्थाने जननायक ठरले. उरण मतदारसंघात त्यांनी दोन नंबरची 88,878 मते मिळवत महाविकास आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. लोकसभेत केलेल्या कामाच्या बद्दल मोठेपणा दाखवत जर शिवसेनेने शेकापला उमेदवारी दिली असती तर आज 50,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने प्रितम म्हात्रे विजयी झाले असते अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top