महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली.

यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “हिंदुत्व सोडून रडतरौतांच्या नादी लागणे तुम्हाला केवढ्याला पडले हे बघा,

बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे.” तसेच, “रडतरौतांच्या उद्धटपणामुळेच पक्षाचे आमदार सोडून गेले, तरी तुम्ही त्यांना कवटाळून बसलात,” असा आरोपही केला.
