नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

चाळीशीनंतर पेरिमेनोपॉजच्या तक्रारींमध्ये वाढ; हार्मोन थेरपीकडे महिलांचा वाढता कल ः प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुरभी सिद्धार्थ

4kNews कामोठे
पनवेल, दि. 30 (वार्ताहर) ः चाळीशीनंतर महिलांमध्ये पेरिमेनोपॉजशी संबंधित तक्रारी वाढत असून, वेळेवर निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हार्मोनल आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि सोशल मीडियावरील माहितीमुळे अनेक महिला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या उपचारपद्धतीकडे वळत आहेत. 


खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी सांगितले की, पेरिमेनोपॉज हा रजोनिवृत्तीपूर्वीचा संक्रमणकाळ असून या काळात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे अनियमित मासिक पाळी, हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणे, झोपेचा त्रास, मूड स्विंग्स, थकवा, चिंता आणि योनीमार्गातील कोरडेपणा अशी लक्षणे दिसू शकतात. उपचारांकडे दुर्लक्ष केल्यास हाडांची झीज, हृदयविकाराचा धोका आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 


त्यांच्या मते, योग्य महिलांमध्ये  मुळे लक्षणांवर प्रभावी नियंत्रण मिळते, झोप आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते तसेच जीवनमान उंचावते. मात्र, उपचार प्रत्येक महिलेच्या वय, वैद्यकीय इतिहास आणि लक्षणांनुसारच ठरवले जातात. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन यांचाही उपचारांमध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top