नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

पनवेलमध्ये श्री साई नारायण बाबा आश्रमात श्री गुरु पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने संपन्न
अभिषेक, मंत्रोपदेश, महाचरण पूजा व महाप्रसादात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

4kNews कामोठे
पनवेल, दि.  30 (वार्ताहर) : पनवेल येथील स्टेशन रोडवरील श्री साई नारायण बाबा आश्रम आणि श्री साईबाबा मंदिरात श्री गुरु पौर्णिमा उत्सव बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यास पनवेलसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


सकाळी अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मंत्रोपदेश, महाचरण पूजा, सामूहिक प्रार्थना आणि विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांनी सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद घेतले.
उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. तसेच आश्रमात आलेल्या प्रत्येक साईभक्ताला आयोजकांच्या वतीने ‘साईरक्षा’ भेट देण्यात आली. दिवसभर आश्रम परिसरात भक्तिरस ओसंडून वाहत होता.


दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साई नारायण बाबा आश्रमातील गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. धार्मिक विधी, सामूहिक प्रार्थना आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रमाचे विश्वस्त, स्वयंसेवक आणि सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचे कौतुक करत सद्गुरूंचे आशीर्वाद घेत उत्सवाची सांगता केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top