महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला. अनेकांनी यावर संशय घेतला आहे. आता वकिल असीम सरोदेंनी एक फेसबुक पोस्ट केली.

त्यामुळे निकालाला आव्हा देणारी याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. ‘अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे. यापूर्वी अशा शंका कधी नसायच्या’, असं सरोदेंनी म्हटलंय.
