नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती


4kNews कामोठे
उरण दि. 18 (विठ्ठल ममताबादे) : नागपंचमीनिमित्त सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण यांच्या वतीने ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ या विषयावर तीन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.



रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथे तुषार म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन येथे जयवंत रामदास ठाकूर, तर पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोन येथे निकेतन रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्पांचे पर्यावरणातील महत्त्व, सर्पांविषयीचे गैरसमज व अंधश्रद्धा, सर्पदंशापासून बचाव, प्रथमोपचार आणि सर्प-मानव सहजीवन याबाबत वैज्ञानिक माहिती देण्यात आली. सर्पांविषयीची भीती दूर करून त्यांचे संवर्धन व मानवी सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचे आवाहन करण्यात आले.



हा उपक्रम संस्थेच्या ‘शून्य सर्पदंश मृत्यू अभियान’चा भाग असून, Snakebite Action Team (S.A.T.)च्या माध्यमातून सर्पदंशाच्या घटना व मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल समिती सदस्य तसेच FONचे स्वयंसेवक हृषिकेश म्हात्रे व जय गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top