4k समाचार दि. 9
पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर १७, पीएल ५/२८च्या समोर गणेश मंदिरा जवळ होणाऱ्या या उत्सवात बुधवारी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना पूजन व आरती, तर रात्री ०८ ते ११ वाजेदरम्यान भजन, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी ०५ वाजता श्री गणेश मुर्ती विसर्जनाची भव्य मिरवणूक असणार आहे. या उत्सवाचा जास्तीत जास्त भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सवाच्या आयोजिका पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत व पनवेल वैद्यकीय सेलच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता घरत यांनी केले आहे.
