नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

रस्ते, लाईट, आरोग्यसेवा – कामोठेकर त्रस्त, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पालिकेला इशारा

पनवेल :सप्टेंबर 9 (4K समाचार)कामोठे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सोयीसुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे आज पनवेल महानगरपालिकेत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले. या मागणीपत्रात नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यांच्याशी संबंधित अनेक तातडीच्या विषयांचा समावेश आहे.



📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

कामोठे सेक्टर २१ येथील चौकाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील चौक” असे करणे.
कामोठे सेक्टर १० मधील विक्रम कॉम्प्लेक्स (ग्लोबल मेडिकल) ते स्मशानभूमी दरम्यानचा रस्ता त्वरित दुरुस्त करणे.
सेक्टर १० व परिसरातील रस्त्यांवर नवीन स्ट्रीट लाईट बसविणे व बंद पडलेले लाईट सुरू करणे.
ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी घरपोच आरोग्यसेवा सुरू करणे.
रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
स्मशानभूमीतील चिमणी त्वरित कार्यान्वित करणे




सदर मागण्या नागरिकांच्या सोयी, आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले. कामोठे व परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले.

🗣️ अध्यक्ष सागर दिलीप पाटील म्हणाले :
“कामोठे परिसरातील नागरिकांच्या अडचणी दीर्घकाळ प्रलंबित आहेत. नागरिकांच्या सोयी, सुरक्षितता आणि आरोग्याशी निगडित प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास कामोठेतील नागरिकांचे जीवनमान उंचावेल. महानगरपालिका व संबंधित विभागांनी सकारात्मक दृष्टीकोनातून त्वरित पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.”
सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानने विश्वास व्यक्त केला आहे की प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या मागण्या लवकरच मार्गी लागतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top