कराड (4K News)अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती शुभांगी सुरेशराव खरात (उद्योगिका, श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, कामोठे, मुंबई) यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे. शुभांगी खरात यांनी सातत्य, मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजासाठी विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांना प्रेरणा मिळावी, या हेतूने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी अहिल्यारत्न हा विशेष पुरस्कार प्रदान करून शुभांगी खरात यांचा गौरव झाला. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रवीण काकडे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य तो सन्मान देऊन त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
🗣️ सौ. शुभांगी खरात म्हणाल्या :
“हा सन्मान माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. हा पुरस्कार मला समाजाच्या आशिर्वादामुळे आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मिळाला आहे. समाजाच्या विश्वासामुळेच मला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. पुढेही समाजहितासाठी अधिक जोमाने काम करणे, हेच माझे खरे ध्येय

