मानसरोवर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अश्विता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मावळते अध्यक्ष रो. रवींद्र अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण धोत्रे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रो. लक्ष्मण पाटील, विशेष वक्ते रो. जीवन महालकर, क्लबचे सल्लागार डॉ. दीपक खोत, तसेच रो. राजेंद्र म्हात्रे, डॉ. विकास शिंदे, अजिंक्य राणे, श्रीकांत पाटील, धर्मराज मच्छिगर, प्रवीण वरे, संदीप बळीप आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष संजय रोकडे यांनी आगामी काळात युवांना उद्योजकतेसाठी प्रेरित करणे, बिझनेस नेटवर्किंगच्या माध्यमातून समाज उपयोगी प्रकल्प राबवणे आणि समाजातील गरजूंपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवणे, असे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच रोटरीच्या मूल्यांचा प्रसार करत समाज उपयोगी सेवा प्रकल्प अधिक प्रभावीपणे हाती घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
