रविवार दिनांक १३ जुलै 4k समाचार रोजी सायंकाळी ७.०० वा. नविन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज चा १३ वा पदग्रहण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास सन्मानिय अतिथी ए. जी. बालरोगतज्ञ डॉ. स्वाती लिखिते व मुख्य अतिथी रोटरीचे २०२५-२६ डिस्ट्रिक्ट ३१३१ चे फाऊंडेशन को डायरेक्टर अस्थिरोगतज्ञ डॉ. अमोद दिवेकर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून आणि राष्ट्रगीताने या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात झाली. पाहुण्यांना तुळशी वृंदावन देऊन आणि उपस्थितांना गुलाबाची फुले देऊन स्वागत केले गेले. या सोहळ्यात रोटरी २०२४-२५ चे अध्यक्ष रो. विजय गोरेगांवकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रो. रुपाली यादव यांना अध्यक्ष पदाची कॉलर व क्लब चार्टर सादर केले. तसेच २०२४-२५ चे सेक्रेटरी रो. रूपेश यादव यांनी नवनिर्वाचित सेक्रेटरी रो. अर्चना जाधव यांना कॉलर सादर केली.

नवनिर्वाचित अध्यक्ष रुपाली यांनी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची एक एक करून ओळख करून दिली त्यांना दोन्ही पाहुण्यांनी रोटरीच्या डायरेक्टर पदाची पिन लाऊन त्यांचा गौरव केला. मावळते अध्यक्ष रो विजय यांनी त्यांच्या भाषणात २०२४-२५ या रोटरी वर्षात केलेल्या डी जी शितल शहा यांच्या
प्लेइंग इलेवन या महत्वकांशी प्रकल्पांबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने उपस्थितांना महिती करून दिली. तसेच वर्षभरात इतर केलेले प्रकल्प ही त्यांनी सादर केले. त्यांच्या भाषणाअंती त्यांनी वर्षभरात त्यांना सहकार्य केलेल्या सर्व रोटरी सदस्य, सहयोगी संस्था, सरकारी यंत्रणा यांचे आभार व्यक्त केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष यांची ओळख रो. दिलीप जाधव व नवनिर्वाचित सेक्रेटरी यांची ओळख रो. काशिराम पाटील यांनी करून दिली. अध्यक्ष रुपाली यांनी आपल्या भाषणात डी जी २०२५-२६ रो. संतोष मराठे यांचे जास्त लक्ष पर्यावरण या विषयात असल्यामुळे त्यात जास्त काम करणार असून चेरी ब्लॉसम, माय सिटी माय प्राईड, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर यासाठी जागरूकता तसेच कॅन्सर प्रिव्हेंशन वॅक्सिन शिबीरे, मॅमोग्राफी शिबीरे, लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन ई. प्रकल्प आवर्जुन करण्याचा मानस असल्याचे बोलुन दाखवले.

सन्मानिय अतिथी ए. जी. डॉ. स्वाती लिखिते यांची ओळख रो. बाळकृष्ण आंबेकर यांनी केली. डॉ लिखिते यांनी त्यांच्या भाषणात क्लबच्या असेंबली मिटींगचे नियोजन, क्लबच्या सदस्यांच्या कुटुंबात असलेले घट्ट संबंध तसेच मागील वर्षात केलेल्या कामाचे गौरोदगार काढून मावळते अध्यक्ष यांचे आणि संपूर्ण क्लबचे अभिनंदन केले. तसेच डीजी संतोष यांचा मेसेज दिला व रो रूपाली यांस आणि त्यांच्या डायरेक्टर यांस नवीन रोटरी वर्षाकरिता मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणाअंती क्लबवरती काव्यात्मक रचना ऐकवली.

मुख्य अतिथी रो. डॉ. अमोद दिवेकर यांची ओळख पास्ट प्रेजिडेंट रो. मधुकर नाईक यांनी करुन दिली. नंतर डॉ. दिवेकर यांनी त्यांचे भाषण वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर केले. त्यांनी त्यांच्या भाषणात या क्लबच्या नावाला साजेशे असे त्यांचे काम असून ते समाजात एक आशेचा किरण असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे प्रकल्प हे लहानापासून मोठ्या प्रमाणात केले जातात असे सांगितले.
पनवेल सनराईज हे फक्त पनवेलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एक समानार्थी नामक बनले आहेत असे गौरोद्गार काढले. पुढे त्यांनी काव्यात्मक आणि अतिशय मार्मिक पद्धतीने क्लबच्या केलेल्या तीस प्रकल्पांवर नव दृष्टिक्षेप टाकला. तसेच प्रत्येक सनराइजर्स चे त्यांच्या व्यावसाईक/ नोकरी/ पद व कार्य यांची सांगड त्यांच्या वैयक्तिक रोटरी कार्य पद्धतीने मांडली. त्यानंतर त्यांनी रुपाली व त्यांच्या डायरेक्टर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन भाषण संपविले.
दरम्यान दोन्ही अतिथींच्या हस्ते सहयोगी संस्था जाणीव सामाजिक सेवा संस्था, शिरोमणी संत रोहिदास सेवा मंडळ, पनवेल, आपल्या दातृत्वासाठी सौ. श्वेता अभिषेक आंबेकर तसेच विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यथार्थ यादव आणि संकेत पाटील यांना सन्मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.
रो अर्चना यांनी सेक्रेटरियल अनाउन्समेंट मध्ये सभेसाठी असलेली एकूण उपस्थिती, झालेले व होणारे या महिन्यातील प्रकल्प आणि सभांचे नियोजन कळविले.
पुढे प्रेसिडेंट इलेक्ट रो. काशीराम पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
सर्वात शेवटी रो रूपेश यांनी रोटरी सनराईजचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढवा याबद्दल माहिती करून दिली. अँस आंबेकर आणि वनीता गोरेगांवकर, अनेट भूमी जाधव यांच्या सहकार्याने दोन्ही अतिथी आणि उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. कीसर्व उपस्थितांनी फोर वे टेस्ट म्हटल्यानंतर अध्यक्ष रो. रूपाली यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन रो. बाळकृष्ण आंबेकर यांनी केले.
या सोहळ्यानंतर क्लबमार्फत
उपस्थितांना उत्तम जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पनवेल मधिल काही संस्थांचे पदाधिकारी, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष व सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.