पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल ची मुलगी, केव्हीके कन्याची विद्यार्थ्यांनी दुर्पता साउद (छोटी) हीने नुकत्याच अकोला येथे झालेल्या शालेय राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 44 किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले व आता राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप ला महाराष्ट्र च प्रतिनिधित्व करणार आहे.

दुर्पता पनवेल मध्ये एमपीएसए बॉक्सिंग क्लबला सराव, कोच अद्वैत शेंबवणेकर व उमेश रजक यांचा मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत आहे व सातार्यात अंतराष्ट्रिय प्रशिक्षक व भारतीय पोलीस कोच सागर जगताप यांचा कडे प्रशिक्षक घेत आहे. या तिच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन कमिटी, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी तीचे अभिनंदन केले आहे.
