4k समाचार
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा, उरण येथील गेटसमोर सुरू आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली. तसेच, १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला.
