नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

ट्रेकींगसाठी जावून खोलदरीत अडकलेल्या तिघांना सुखरुप काढले बाहेर


पनवेल, दि.3 (वार्ताहर) 4kNewsः तळोजा कारागृह शेजारील डोंगरावर वरळी येथून ट्रेकिंगसाठी आलेले तिघेजण रस्ता चुकल्यामुळे खोल दरीत अडकले होते. या पर्यटकांना पोलिस, अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे.


वरळी दादर येथील संजय धवल हा त्यांच्या दोन सहकार्‍यांसह तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग करताना वाढलेले गवत आणि झाडाझुडूपांमुळे तिघेही भरकटले. बाहेर पडण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, बर्‍याच प्रयत्नानंतरही कसोशीनेही यश मिळाले नसल्याने नातेवाइकांना संपर्क साधला होता.

यावेळी खारघर परिसरातील पर्यटकांनी नवी मुंबई पोलिसांशी हेल्पलाईनद्वारे संपर्क करत पर्यटकांची माहिती दिली होती. सेक्टर 35 मध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यावरण प्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सहका-याच्या मदतीने डोंगरावर रोप लागवड केली आहे.

नाडकर्णी यांना याबाबतची माहिती मिळताच झाडांची देखभाल करणार्‍या कामगारांना त्यांनी माहिती दिली. झाडांच्या सभोवताली लावलेल्या नेटचा आधार घेत कामगारांनी तिघांना बाहेर काढले. यावेळी खारघर अग्निशमन केंद्राचे जवानांसह पोलिस देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top