पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः शिवसेनेच्या प्रयत्नाने पनवेल शहरातील कब्रस्तान परिसरामध्ये साफसफाई मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

शिवसेना पनवेल शहर तर्फे गुलाब हुसेन बागवान (शिवसेना उप-विभाग प्रमुख) यांच्या प्रयत्नाने आज मोमीन पाडा मज्जिद च्या बाजूला असलेले कब्रस्तान हे काही दिवसांपासून अस्वच्छ म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आले होते आणि साफसफाई झाली नव्हती.

यावेळी गुलाब हुसेन बागवान यांनी त्वरित शिवसेना पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान यांच्या साह्याने स्वच्छता निरीक्षक यांना फोन करून तातडीने कब्रस्तान साफसफाई करून घेतली.

यावेळी गुलाब हुसेन बागवाल यांच्यासह मुस्लिम बांधव देखील उपस्थित होते. त्यांनी शिवसेना पक्षासह पनवेल महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.
