पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होताच तळोजा पोलिसांनी या तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

आरोपी यांचे बाबत काही एक माहिती नसताना व फिर्यादी यांना सदर घटनेबाबत विचारता त्यांना काही एक आठवत नसल्याने आरोपीचा शोध घेणे कठीण होत्ते. वपोनि प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, ज्ञानोबा धुळगुंडे, पो. हवा.नैनेश पाटील पो.हवा.सावंत, पो.हवा. मढवी ,पो.हवा. शिंदे , पो.शि. उगाडे , पो.शि. माने.पो.शी.अनिल जाधव आदींच्या पथकाने आरोपीचा तात्रिक तपास व पोलीस ठाणे हद्दीतील तसेच खारघर परिसरातील 30 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध घेतला असता

त्यांना मोहम्मद जुबेर खान (23), ओवेस झुबेर शेख (19), साजिद खाजा शेख (19) यांना तळोजा गावातून ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुह्याचे अनुषंगाने तपास करता त्यानी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
