पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या व विविध गुन्ह्यात जप्त असणार्या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने दुुचाकी मोटार सायकल, रिक्षा, स्कुटी गाड्या, स्वीफ्ट कार, नॅनो कार, बजाज पल्सर, युनिकॉर्न मोटार सायकल, टोयॅटा, टँकर अशा प्रकारे एकूण 82 वाहने या पोलीस ठाण्यात असून सदर वाहन मालकांनी या संदर्भात पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा यासाठी वपोनि

प्रवीण भगत दुरध्वनी क्र.022-274123333, मो.नं.9870301090, पो.नि.(गुन्हे) मो.नं.9326445100 व पो.हवा.निवळे मो.नं.9082125141 यांच्याशी व्यक्तीशः अगर मोबाईलवर फोनवर संपर्क साधावा असे आवाहन वपोनि प्रवीण भगत यांनी केले आहे.
