नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

कामोठे मधील वाढत्या वाहतूक कोंडी व अनियमित पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत शिवसेनेची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

4k समाचार
पनवेल दि. 27(वार्ताहर): कामोठे सेक्टर ३४ व ३५ परिसरात मालवण तडका आणि नीलकंठ हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज गंभीर स्वरूपाची वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याची रुंदी कमी असतानाही दोन्ही बाजूंना अनियमितपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिवसेना उप शहर प्रमुख  कामोठे सचिन त्रिमुखे यांनी  वाढत्या वाहतूक कोंडी व अनियमित पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत पनवेल महापालिइकचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे  


 पाणवळ्याच्या समोर रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहने अनधिकृतपणे उभी केल्यामुळे मार्ग अत्यंत अरुंद होऊन वाहतूक ठप्प होते. अनेक वेळा अपघाताच्या घटना टळल्या आहेत. यामुळे दैनंदिन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असून पादचारी, शाळकरी मुले व जेष्ठ नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाने अनियमित व अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई, परिसरात योग्य व अधिकृत पार्किंग झोनची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक मार्गदर्शक फलक, नो-पार्किंग चिन्हे व रेषांकन आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अडथळे व अतिक्रमण तातडीने हटवण्याचाही मागणी करण्यात आली आहे. 

ही समस्या मागील अनेक दिवसांपासून कायम असून नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. म्हणून पनवेल महानगर पालिका मार्फत त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, ही विनंती. शिवसेना उप शहर प्रमुख  सचिन त्रिमुखे आणि समाज सेविकामधुमती त्रिमूखे यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना शहर सह संघटक संतोष गोळे, युवासेना महानगर अधिकारी महेश भिसे, माजी उपशहर प्रमुख बाळ मंचेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top