नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड


पनवेल दि.(१५(वार्ताहर): तळोजा परिसरात अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड करून मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत केला आहे.


तळोजा पोलीस  ठाणे हद्दीतील पाले खुर्द येथील इसम विकास नारायण दुर्गे ( वय 50 वर्षे) हा त्याचे स्वतःचे मालकी जागेत अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करत असल्याची माहीत तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी १४०७ सिलेंडर मिळून आले असून त्यापैकी ४३८ भरलेले सिलेंडर व ९६९ रिकामे सिलेंडर मिळून आले आहेत. सदर इसमाकडे सिलेंडर गॅस विक्रीचे व साठवणूक करण्याचे कोणतेही कागदपत्रे नाहीत.

सदर ठिकाणी विकास दुर्गे याचेसह बबलू पवार, (51 वर्षे  वाहन चालक) व लखन जाधव (23 वर्षे हे काम पाहत होते. सदर इसम हा विष्णू भारत गॅस, पनवेल येथून दररोज 80 सिलेंडर 14 किलोग्रॅम वजनाचे 803 रुपये प्रति सिलेंडर दराने व वरद विनायक एचपी गॅस, कळंबोली येथून 1 दिवसाआड 48 सिलेंडर 14 किलोग्रॅम वजनाचे 825 रुपये प्रति सिलेंडर दराने ब्लॅकने खरेदी करत आहे. तसेच दर 3 दिवसाने 234 सिलेंडर 19 किलोग्रॅम वजनाचे सिलेंडर बीपीसीएल उरण येथून फ्रेंडस भारत गॅस, घणसोली यांचे नावाने खरेदी करायचा. हे सिलेंडर वाहतूक करण्याकरिता विकास दुर्गे याच्याकडे आयशर टेम्पो, महिंद्रा पिकप तसेच टाटा छोटा हत्ती अशी तीन वाहने आहेत. या

घटनास्थळावरून गॅस सिलेंडर रिफिलिंग करण्याचे सामग्री देखील मिळून आली आहे. सदर इसम हा चिंध्रन, पालेखुर्द, वावंजे, कुत्तरपाडा, देवीचापाडा, पाटीलवाडी येथील हॉटेल, दुकानदार, काही घरगुती यांना सिलेंडर विक्री करत असल्याची माहीत मिळाली आहे. या त्रिकुटाच्याटकेमुळे अवैध धंद्यांना आळा बसणार असल्याची माहिती वपोनि प्रवीण भगत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top