भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.

शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, कामगारनेते रवींद्र नाईक, के.सी. पाटील गुरुजी, विश्वजित पाटील, अशोक आंबेकर, अंकुश पाटील, शत्रुघ्न उसाटकर, महेंद्र गोजे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
